कोपर्डी अत्याचार चव्हाट्यावर आणणारा 7 तासाचा रास्ता रोको

कोपर्डीतील मराठा कन्येवरील अमानुष अत्याचाराचं दडपलेलं प्रकरण शिवप्रहारचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या घणाघाती नेतृत्वाने हजारो समाजबांधवांचा 16 जुलै 2017ला कर्जत जि.अहमदनगर येथे सात तास रास्ता रोको घडवून आणून चव्हाट्यावर आणलं.सर्व संघटना,पक्ष,नेते,कार्यकर्ते खर्या अर्थाने इथेच पहील्यांदा एकत्र आले.इथूनच खर्या अर्थाने सुरू झाला मराठा क्रांती आंदोलनाचा ऐतिहासिक प्रवास.