खासदारांच्या घरावर भजन-किर्तन धरणे आंदोलन

मराठा क्रांती मोर्चांतील मागण्यांबाबत संसदेत खासदार गप्प का? *अहमदनगर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने ( दि 30/11/2016 रोजी) टाळ मृदुंगासह दिंडीने जाऊन अहमदनगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधींच्या घरासमोर भजन -किर्तन धरणे आंदोलन करण्यात आले.* मराठ्यांची मते घेता मग मराठ्यांच्या मागण्यांबाबत संसदेत आवाज का उठवित नाहीत असा प्रश्न समक्ष जाऊन उपस्थित करण्यात आला. फक्त मराठाच नाही तर सर्वजातीय,सर्वपक्षीय आमदार-खासदार मग ते कोणीही व कितीही मोठे असोत,यांना जाब विचारलाच पाहीजे...आम्ही कृती केली आहे आपणही करावी...निर्भीड व्हावे...तरच न्याय मिळेल. #जय मराठा #जय शिवराय!