शिवप्रहार द्वितीय वर्धापणदिन,३ आँगस्ट २०१६,अहमदनगर

- प्रेसनोट - शिवप्रहार संघटना राज्यकार्यकारणी बैठकीतील निर्णय... "वेबसाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून खोट्या अँट्रासिटी केसेसची माहीती संकलित करणार" अहमदनगर,दि.३आँगस्ट- क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती व शिवप्रहार संघटनेच्या द्वितीय वर्धापणदिनी शिवप्रहार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक अहमदनगर येथे संपन्न झाली.प्रारंभी छत्रपती शिवराय व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संघटनेची ध्येयधोरणे व वाटचाल याबाबत बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले.शिवप्रहारचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी संघटनेचे उद्दीष्ट व कार्यपद्धती बाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.मराठा संघटनांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील मोर्चास परवानगी नाकारले प्रकरणी बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला.अँट्रासिटी कायद्याचा गैरवापर,मराठा आरक्षण जनआंदोलन,मराठा,तसेच दलितेतर समाजातील अन्याय-अत्याचाराची प्रकरणे,शेतकर्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे,कोपर्डी,भांबोरा घटनांबाबत कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणे,आदी विषयांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी माजी पोलीस उपायुक्त तथा शिवप्रहार संघटनेचे प्रदेश संघटक अरूण कदम,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बबन माने,मराठवाडा अध्यक्ष निलेश मदन,प्रदेश कोषाध्यक्ष उद्योजक महादेव बिरंगळ,आदींनी विचार मांडले. अँट्रासिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून खोट्या केसेसची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासाठी www.shivprahar.org या शिवप्रहार संघटनेच्या अधिकृत वेबसाइटवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आँनलाईन,तसेच तालुका पातळीवर सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. कोपर्डी येथील ज्येष्ठ नागरीक झुंबर सुद्रीक,लालासाहेब सुद्रीक,मधुकर सुद्रीक,विजय सुद्रीक,सुरेश सुद्रीक यांनीही बैठकीत भावना व्यक्त केल्या.निडर मावळ्यांची शिवप्रहार संघटना अन्याय-अत्याचार करणारांसाठी कर्दनकाळ ठरत आहे असे ते म्हणाले. बैठकीस पुणे जिल्हाध्यक्ष कैलास आवारी,जालना जिल्हाध्यक्ष बिभिषन नन्नवरे,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड,सोलापूर जिल्हा संघटक स्वप्नील नागटिळक,पुणे जिल्हा संघटक प्रा.सुहास डुचे,पुणे शहराध्यक्ष प्रकाश कुंभार,नवनाथ आढाव,बाबासाहेब तांबे,लक्ष्मण मोहीटे,अनिल आवारी,सुधीर रसाळ,सचीन चौगुले,अमोल रोकडे,यशवंत तोडमल,संभाजी माळवदे,अमोल पाठक,सुनील काकडे,राजेंद्र कर्डीले,रवि महाडीक,सागर ठुबे,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.