पिंपळगाव खांडच्या पाण्यासाठी निकराचा लढा

पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचं हे आंदोलन अभूतपूर्व,ऐतिहासिक आणि अविस्मरणीय! २५ जाने १६.स.११ लग्नाच्या वर्हाडाच्या गाड्या भराव्यात तशा शंभराच्यावर गाड्या भरून गावोगावची माणसं बेमुदत धरणे आंदोलनासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकली.अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या साकूर,मांडवे बु.मांडवे खु.देसवडे,बिरेवाडी,शिंदोडी,खडकवाडी,पळशी,पोखरी,जांबूत खु.जांबूत बु.आदी गावांना मिळावे व टंचाईग्रस्त गावांचे मुळा नदीवरील केटीवेअर्स भरूण मिळावेत म्हणून आमच्या संकल्पनेतून हे बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते.सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते,अडीच तीन हजार शेतकरी ठेचा-भाजी,भाकरीसह रात्रीच्या मुक्कामासाठी घोंगड्या,गोधड्या,चादरी-सतरंज्या घेऊन तयारीनिशीच आले होते.दुपारचे अन् रात्रीचेही जेवण जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर रस्त्यावर झाले.दिवसभर उन्हात घोषणांचा गदरोळ,भाषणं अन् भजनं व गाणीही.सगळंच रोमांचकारी.निर्णय होत नाही तोपर्यंत उठायचं नाही हाच सर्वांचा ठाम निर्धार.वेळ पडली तर महिला-मुलांनाही बोलवून घ्यायचं असा निश्चय.दुसर्या दिवशी प्रजासत्ताक दिन.त्यामुळे तणावही भरपूर.अनेक अधिकारी बसून अन् पोलीस फौजफाटाही तयारीत.शेवटी रात्री ११वा जिल्हाधिकार्यांनी पिण्यासाठी पाणी सोडीत असल्याचे माझ्या नावे लेखी पत्र देऊन आमची मागणी मान्य केली आणि आम्ही जिंकलो व उर्वरीत लढाईचा पायाही घातला. सर्वपक्षीय नेत्यांचं व वेगवेगळ्या गावच्या खुप जणांचं मोलाचं योगदान या लढ्याला लाभलं.आमच्या गावांसाठीच्या या ऐतिहासिक आंदोलनाचं नेतृत्व आमच्याकडे होतं ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब होय. --संजीव भोर पाटील,संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य,मो.९९२१३८११८१